नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आता या योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहे.
आतापर्यंत मित्रांनो या योजनांच्या लाभार्थ्यांना 1000 रुपये दरमहा मिळत होते परंतु आता या अनुदानामध्ये 500 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणून आता या योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे.
मित्रांनो 5 जुलै 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या ठिकाणी आदेश काढण्यात आलेला आहे, त्यानुसार या ठिकाणी आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आता दरमहा 1500 रुपयाची अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे.
तसेच लाभार्थ्यांच्या मुलाची 25 वर्षे वयाबाबत ची अट रद्द करण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा या ठिकाणी पुढच्या महिन्यापासून 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
