नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ! 4000 रुपये खात्यात येणार ll Namo Shetkari Yojana 1st installment

नमो शेतकरी पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली दिवाळीपूर्वी 2000 ऐवजी 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हो मित्रांनो दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 रोजी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे 




मित्रांनो 26 तारखेला किती वाजता नमो शेतकरी चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल आणि 2000 ऐवजी 4000 रुपये कसे मिळणार ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत 


राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वितरित करावा अशी इच्छा व्यक्त केली होती तर या इच्छेला सन्मान देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 26 तारखेला शिर्डी पी एम किसान योजनेप्रमाणेच डीबीटी च्या यातून एकांकिकेत द्वारे नमो शेतकरी चा पहिला हप्त्याचे वितरण हे राज्यातील 93 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना करणार आहेत आणि समोर आलेल्या माहितीनुसार 26 तारखेला दुपारी ठीक 12 वाजून 30 मिनिटांनी हप्ता वितरीत करणार आहेत


 म्हणजेच मित्रांनो येत्या गुरुवारपर्यंत नमो शेतकरी चा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळून जाईल आता राहिला विषय 2000 ऐवजी 4000 रुपये कसे मिळणार तर पहा मित्रांनो अलीकडेच केंद्र शासनाकडून सांगण्यात आले होते की पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा ₹2000 चा पहिला हप्ता आणि पी एम किसान योजनेचा ₹2000 चा पंधरावा हप्ता असे दोन योजनेचे 4000 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील 


मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर याच महिन्याच्या अखेर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत केला जाईल तर असे 2000 ऐवजी 4000 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती


Post a Comment

Previous Post Next Post